बुलडाण्यातील आरटीपीसीआर लॅब कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:53 AM2020-09-25T09:53:23+5:302020-09-25T09:53:30+5:30

प्रतिदिन ६० नमुन्यांची प्रारंभी या लॅबमध्ये तपासणी करण्यात येणार आहे.

Operating RTPCR Lab in Buldana | बुलडाण्यातील आरटीपीसीआर लॅब कार्यान्वीत

बुलडाण्यातील आरटीपीसीआर लॅब कार्यान्वीत

Next

बुलडाणा: अनेक अडचणीचा सामना केल्यानंतर अखेर बुलडाण्याची आरटीपीसीआर ल२ब गुरुवारी अधिकृतस्तरावर कार्यान्वीत झाली आहे. दरम्यान, प्रतिदिन ६० नमुन्यांची प्रारंभी या लॅबमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. गुरूवारी प्रयोग शाळेत प्रत्यक्ष जिल्ह्यातील संदिग्धांचे अहवाल तपासण्यात आले.
विशेष म्हणजे २२ सप्टेंबर रोजी बुलडाण्याच्या या लॅबला ‘आरटीपीसीआर’ने मान्यता दिली होती. सोबतच कोरोनाचे अहवाल तपासण्याची तांत्रिक कुशलताही लॅबमधील तंत्रज्ञांनी अवगत केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर गुरूवारी प्रत्यक्ष पहिल्या लॉटमधील नमुनयांची तपासणी करण्यात आली. गेल्या दोन महिन्यापासून बुलडाण्याची आरटीपीसीआर लॅब कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखरे प्रत्यक्षात आता ही लॅब सुरू झाली आहे.
बुलडाण्यात लॅब नसल्यामुळे प्रारंभी येथील संदिग्धांचे नमुने हे अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर तथा वर्धा येथील खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. त्याला बराच विलंब लागत होता. बऱ्याचदा संदिग्धांचे स्वॅब नमुने हे योग्यरित्या लॅब पर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे संदिग्ध रुग्णांना मानसिक त्रासही सहन करावा लागत होता.
मात्र या सर्व पार्श्वभूमीवर बुलडाण्यातील ही लॅब त्वरित कार्यान्वीत व्हावी, यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी युद्द्धपातलीवर प्रयत्न करीत निधी उपलब्ध केला होता. सोबतच प्रस्तावही तातडीने पाठवून प्रत्यक्ष लॅब कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यास अखेर यश आले आहे. दोन नमुनयांची तपासणी केल्यानंतर ते आयसीएमआरकडे पुन्हा तपासणीसाठी पाठविले होते. तसेच बुलडाण्याच्या लॅबचे परीक्षण आयसीएमआरने केल्यानंतर प्रत्यक्षात गुरूवारपासून ही लॅब अधिकृतस्तरावर कार्यान्वीत झाली आहे.

Web Title: Operating RTPCR Lab in Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.