पदोन्नतीमधील आरक्षण स्थगितीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:37+5:302021-06-26T04:24:37+5:30
राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षण बंद करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे संघटनात्मक संविधानिक अधिकार डावलल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. आरक्षणानुसार ...
राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षण बंद करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे संघटनात्मक संविधानिक अधिकार डावलल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. आरक्षणानुसार तत्काळ पदोन्नती मिळावी यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने तहसील कार्यालय व जिल्हा अधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आले. या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे लक्ष वेधावे यासाठी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून आंदोलन करण्यात आले. मागासवर्गीयांचे पदोन्नतीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष एस. वाय. इंगळे, पो. एस. गवई, ए. के. गवई, के. बी. उबाळे, ए. एस. झिने उपस्थित होते.