स्वकीयांना सांभाळत विरोधकांना गळाला लावण्याची कसरत
By admin | Published: October 5, 2014 11:44 PM2014-10-05T23:44:53+5:302014-10-05T23:44:53+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू.
बुलडाणा : स्वबळाची ताकद अजमाविण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या पैलवानांना आता दुप्पट ताकदीने कसरत करावी लागत आहे. सर्वच मतदारसंघात हो त असलेल्या पंचकोनी लढतीमुळे उमेदवारांपुढे पेच निर्माण झाला असून, स्वकीयांची नाराजी सांभाळत विरोधकांना गळाला लावण्याचे प्रयत्न जोमाने सुरू झाले आहेत.
बुलडाणा, मलकापूर, मेहकर व चिखली या मतदार संघात विशेष करून उमेदवारीवरून स्वकीयांवर नाराज झालेली मंडळीच या निवडणुकीत स्वताला ह्यहुकमी एक्केह्ण ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पडद्याआडच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिकच महत्त्वाची मानली जात आहे.
आघाडी व युती दुभंगल्याने दोन्ही पक्षात अनेकांना संधी मिळाली असली, तरी जागा एक व इच्छुक अनेक असल्याने मोठया प्रमाणावर नाराजीही व्यक्त होऊ लागली. अशा परिस्थितीत बहुरंगी लढतीत स्वकीयांतील नाराजांबरोबरच विरोधकातील नाराजांवर निवडणुकीच्या यशाचे गणित अवलंबून असल्याने व तीच डोकेदुखी असल्याने अधिकृत उमेदवारांनी त्याकडे गांभीर्याने घेण्यासाठी सुरूवात केली आहे.
स्वकीयांची नाराजी पक्षाचे नेते काढतील असे गृहीत धरून विरोधी पक्षातील नाराजांना गळ टाकला जात आहे. त्यांची नाराजी मतांमध्ये परिवर्तन व्हावी, यासाठी थेट नाराजांशी न बोलता, दिवसातील उजेडाऐवजी त्यांच्या जवळच्या सहकार्यांकरवी ह्यसमेटह्ण घडविण्यासाठी सुरूवात केली आहे. यासाठी रात्रीचा अंधारच अधिक प्रभावी ठरू लागला आहे. त्यात राजकीय डावपेच व व्युहरचना आखले जात आहेत. निवडणूक रिंगणातील जवळपास सर्वच उमेदवारांनी अशा प्रकारच्या छुप्या तडजोडींना प्राधान्य देत त्यातून निवडणूक सोपी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.