विरोधकांकडे ना झेंडा, ना अजेंडा : मुख्यमंत्री शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 06:08 AM2024-04-15T06:08:18+5:302024-04-15T06:09:08+5:30
बुलढाण्यातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी धाड नाक्यावर पदाधिकारी मेळावा रविवारी घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क, बुलढाणा : विरोधकांकडे ना झेंडा, ना अजेंडा आहे. नेता, नीती, नियमही नाहीत. फक्त करप्शन फर्स्ट आहे. आमच्याकडे नेशन फर्स्ट आहे, धोरण आहे. त्यामुळेच मोदी सरकारची जनतेनेच ‘गॅरंटी’ घेतली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथे केले.
बुलढाण्यातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी धाड नाक्यावर पदाधिकारी मेळावा रविवारी घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, सिल्व्हर ओकने उठ म्हटले की उठायचे, काँग्रेसने बस म्हटले की बसायचे, अशी उद्धवसेनेची अवस्था झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात एक नकारात्मकता आली होती. ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ ही संकल्पनाच महायुतीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमामुळे बाद झाली आहे. आमचे सरकार सर्वसामान्यांना काय पाहिजे हे हेरून योजना आणते.