खामगाव पालिकेच्या ऑनलाईन सभेत विरोधकांचा ऑफलाइन गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:57 PM2020-12-12T12:57:13+5:302020-12-12T12:59:35+5:30

Khamgaon Municipal Counsil तांत्रिक मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

Opposition's offline commotion in Khamgaon Municipal Counsil's online meeting! | खामगाव पालिकेच्या ऑनलाईन सभेत विरोधकांचा ऑफलाइन गोंधळ!

खामगाव पालिकेच्या ऑनलाईन सभेत विरोधकांचा ऑफलाइन गोंधळ!

googlenewsNext
ठळक मुद्देनगर पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ऑफलाइन गोंधळ उडाला.तहकूबच्या तांत्रिक चुकीवरून विरोधकांनी सत्ताधाºयांची कोंडी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील विविध विकास कामांना तसेच काही योजनांना मंजुरी देण्यासाठी स्थानिक नगर पालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेवरून शुक्रवारी पालिकेत एकच गोंधळ उडाला. स्थगित आणि तहकूब विषयाचा तांत्रिक मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर ऑनलाइन सभेच्या मुद्यावरूनही नगर पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ऑफलाइन गोंधळ उडाला.शिक्षक मतदार संघ निवडणूक आचार संहितेमुळे लांबलेली खामगाव नगर पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी व्हीडीओ कॉन्फरसींगद्वारे आयोजित करण्यात आली. मात्र, स्थगित आणि तहकूबच्या तांत्रिक चुकीवरून विरोधकांनी सत्ताधाºयांची कोंडी केली. 
मुख्याधिकाऱ्यांकडेही विरोधकांनी ऑनलाइन सभा गैरकायदेशीर असल्याचा मुद्दा रेटून धरला. ऑनलाइन सभा सुरू असतानाच विरोधी नगरसेवक नगराध्यक्षांच्या दालनात पोहोचले. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी आतून दरवाजा बंद केला. त्यामुळे चिडलेल्या विरोधी सदस्यांनी नगराध्यक्षांच्या दालनाचा दरवाजा बाहेरून बंद केला. विविध कारणांमुळे पालिकेत एकच गोंधळ उडाला. 


कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत ऑनलाइन सभा योग्य होत्या. मात्र, आता सर्वत्र अनलॉक होत असताना ऑनलाइन सभा घेणे अयोग्य आहे. ऑनलाइन तंत्रज्ञानाबाबत अडचणी आहेत. त्यामुळे खामगाव नगर पालिकेने ऑनलाइन सभा टाळायला हव्यात.
- ओम शर्मा, भाजप, नगरसेवक.


देशात सर्वत्र अनलॉक प्रक्रीया राबविल्या जात असतानाच, विधानसभा, राज्यसभा सभागृहात ऑफलाइन सभा घेतल्या जात आहेत. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचे कारण पुढे करीत खामगाव नगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून ऑफलाइन घाट घातल्या जात आहे.  
- अमेयकुमार सानंदा, गटनेता, काँग्रेस

Web Title: Opposition's offline commotion in Khamgaon Municipal Counsil's online meeting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.