शिक्षकांना बदलीसाठी ३० शाळांचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:37 AM2021-05-20T04:37:36+5:302021-05-20T04:37:36+5:30
ग्रामसेवकांची दांडी, कामे रखडली मेहकर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. प्रशासकीय अधिकारी त्यासाठी झटत ...
ग्रामसेवकांची दांडी, कामे रखडली
मेहकर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. प्रशासकीय अधिकारी त्यासाठी झटत आहेत. मात्र, काही ग्रामसेवक गावांत अनेक दिवस येत नाहीत. कोरोनासारख्या गंभीर संकटात त्यांनी गाव वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले बिनधास्त
बुलडाणा : सुरुवातीला कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात येत होती. मात्र, आता रुग्ण वाढल्याने बाधितांच्या संपर्कात आलेल्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे बाधितांच्या संपर्कात येणारे नागरिकही बिनधास्त बाहेर पडतात.
कोरोनामुळे नागरिकांची शेतीकडे धाव
डोणगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्याने व संसर्गाच्या भीतीने नागरिक शेतातच मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. शेतातील वातावरण प्रसन्न असते. या ठिकाणी संसर्गाचा धोका नसल्याने नागरिकांनी शेताकडे धाव घेतली आहे.
लोणार बसस्थानकात शुकशुकाट
लोणार : येथे जागतिक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने दाखल होत असतात. मात्र, सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने बसस्थानकात पूर्णपणे शुकशुकाट पसरला असल्याचे दिसून येत आहे.
खासगी रुग्णवाहिकांकडून रुग्णांची लूट!
बुलडाणा : ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक खासगी चालकांनी त्याला व्यवसायाचे स्वरूप दिले आहे. कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्या वाढली असून, नातेवाईक अडचणीत सापडले आहेत. सध्या ऑक्सिजन असलेल्या खासगी रुग्णवाहिकांकडून लूट सुरू आहे. ५०० मीटरसाठीही हजारो रुपये भाडे आकारण्यात येत आहे.
जिल्ह्यातील रेमडेसिविरचा काळाबाजार थांबवा!
बुलडाणा : जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळाबाजार होत असून रुग्णांची लूट सुरू आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार थांबवावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
दूषित पाणीपुरवठा, आरोग्य धोक्यात
मोताळा : शहराला पाणीपुरवठा करणारे फिल्टर प्लांट अनेक वर्षांपासून बंद आहे. याठिकाणी कुठलेही नियोजन नाही. अनेक दिवसांपासून मोताळा शहरातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मूग पिकात घातली गुरे
मेहकर : बरटाळा येथील शेतकरी केशव श्रीराम गायकवाड यांच्या शेतात एक हेक्टर मूग पेरलेला होता; परंतु हरिण, रोही, माकड यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने उभ्या पिकात जनावरे घातली. दरम्यान, बरटाळा येथील सरपंच अनिल सांवत यांनी शेतकऱ्याच्या शेतीकडे धाव घेतली आणि शेतकऱ्याला विनंती करण्याचा प्रयत्न केला; परंतु शेतकऱ्याचा राग अनावर झाला होता, म्हणून शेतकऱ्याने मुगात गुरे घातली.
गाव समिती सक्रिय करण्याची गरज
किनगाव जट्टू : कोरोना संसर्ग वाढत असतानाही ग्रामीण भागात काही नागरिक अजूनही बेफिकीर आहेत. नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतवर्षी स्थापन केलेल्या ग्रामीण भागातील कोविड-१९ गाव समित्या पुन्हा सक्रिय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनामुळे सलून व्यवसाय अडचणीत
धाड : कोरोनामुळे सलून व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. दुकाने बंद असल्याने त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. ब्यूटी पार्लर बंद असल्याने महिला व्यावसायिकांनाही चणचण जाणवत आहे.
घरात करमेना अन् शेतात जाता येईना
डोणगाव : कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्वजण घरातच बसून आहेत. बरेच दिवस झाल्याने घरात करमत नाही. शेत दूर असल्याने दुचाकीने जावे तर पोलीस वाहने काढू देत नसल्याने कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.