स्मशानभूमि आरक्षित भुखंडाच्या चौकशीचे आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:46 PM2018-05-19T13:46:18+5:302018-05-19T13:46:18+5:30
जिल्हाधिकारी यांनी देऊळगाव राजा तहसीलदार यांना तत्काळ चौकशी करून करवाई करण्याचे आदेश एका पत्राद्वारे दिले आहे.
देऊळगांव राजा: शहराच्या हद्दीत असलेल्या सर्वे क्रमांक ६६ मध्ये स्मशान भूमिचे आरक्षण असताना एक एक्कर भूखंड अकृषक झाल्याचा प्रकार नुकताच पालिकेकडे बांधकामासाठी परवाना मागितल्या नंतर उघडकीस आला होता. दरम्यान शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जहीर खान यांनी संबंधित व्यक्तिवर फौजदारी खटले दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे १३ एप्रिल रोजी केली होती. सदर तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी देऊळगाव राजा तहसीलदार यांना तत्काळ चौकशी करून करवाई करण्याचे आदेश एका पत्राद्वारे दिले आहे. नगर पालिका हद्दीत सातेफळ रोडवर सर्वे नंबर ६६ हा एक एक्करचा भूखंड असून सदर भुखंडात ३० प्लाट अकृषक असल्याची नोंद पालिकेत २०११-१२ मध्ये करण्यात आली आहे. या ले-आउट मध्ये खंदारे नामक व्यक्तीचा प्लाट असुन त्यांनी बांधकाम परवानगी मिळावी म्हणून पालिकेकडे आॅनलाइन अर्ज केला होता. मात्र पालिकेचे मुख्यधिकारी अजय कुरवाडे यांनी अर्जाचे अवलोकन केले असता, सदर भुखंडाच्या अकृषकसाठी नगरपालिका व नगर रचना विभागाची मान्यता दिसून आली नाही. तसेच डी.पी. आर. मध्ये सदर भूखंड क्षेत्रात पालिकेमार्फत स्मशानभूमिचे आरक्षण आहे. याच बरोबर ४० हजार चौरस फुट क्षेत्रात ३१ हजार चौरस फुट क्षेत्रात प्लॉटिंग व उर्वरित ९ हजार चौरस फुटाचे रस्ते दर्शविलेले नाकाशात दिसून आले. तर स्मशान भूमिचे आरक्षण व ओपन स्पेस नसल्याच्या बाबी उघडकीस आल्या आहे. या वरून सदर सर्वे नंबर ६६ मध्ये स्मशानभूमिचे आरक्षण असताना उपविभागिय अधिकारी बुलडाणा यांनी २०११-१२ मध्ये नियमाबाह्य पद्धतीने अकृषक परवाना दिल्याचे स्पष्ट झाले असून स्मशानभूमिचे आरक्षण असलेल्या भुखंडाची प्लॉटिंग करून विक्री झाल्याची बाब उघडकीस आली आहे. सदर ले-आउट व अकृषक प्रकरणातील व्यक्ति राजकीय क्षेत्रतिल व्यक्ति असून, आपल्या राजकीय दबाव तंत्राचा वापर करून नियमाबाह्य भूखंड अकृषक केल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान सदर भुखंडाची चौकशी करून, असे नियमा बाह्य काम करणाºया संबंधित व्यक्तिवर व जबाबदार अधिकºयावर फौजदारी खटले दाखल करण्याची मागणी शिवसंग्राम संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या कडे १३ एप्रिल रोजी केली होती. जिल्हाधिकारी यांनी शिवसंग्रामच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून यांनी उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांना सदर अकृषक भुखंडाची चौकशी करून करवाई करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा विवेक काळे यांनी देऊळगांव राजा तहसीलदार दीपक बाजड यांना गट क्रमांक ६६ मधील अकृषक ले-आउटची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश १६ मे रोजी एका पत्राद्वारे दिले आहे. यामुळे शहरातील असे बोगस अकृषक करुन प्लॉट विक्री करणाºया भूखंड माफियाचे धाबे दणाणले आहे.