शेतकऱ्यांना मुद्रांक उपलब्ध करून देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:40+5:302021-06-10T04:23:40+5:30
डाेणगाव : खरीप पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बॅंकाकडून मुद्रांकांची मागणी करण्यात येत आहे. गत काही दिवसांपासून डाेणगाव परिसरासह मेहकर तालुक्यात मुद्रांकांचा ...
डाेणगाव : खरीप पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बॅंकाकडून मुद्रांकांची मागणी करण्यात येत आहे. गत काही दिवसांपासून डाेणगाव परिसरासह मेहकर तालुक्यात मुद्रांकांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. याविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी प्रशासनाकडे तक्रार केली हाेती. त्याची दखल घेत उपविभागीय अधिकारी गणेश राठोड तसेच तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी दुय्यम निबंधक प्रकाश टाक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शेतकऱ्यांना पीककर्जासाठी मुद्रांक पेपर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
डोणगाव भागातील मुद्रांक विक्रेत्यांना डोणगावत बसविण्यात यावे व जानेफळ प्रभागातील मुद्रांक विक्रेत्यांना जानेफळमध्ये बसवण्यात यावे व इतर मुद्रांक विक्रेत्यांना नगरपालिका व तहसील आवारात बसविण्यात यावे जेणेकरून तहसीलमध्ये गर्दी व गोंधळ होणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. खरीप हंगामासाठी पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. बॅंकांमध्ये पीककर्ज घेण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांकाची मागणी करण्यात येत आहे. गत काही दिवसांपासून मेहकर तालुक्यात मुद्रांकाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी प्रशासनाकडे मागणी करून मुद्रांक उपलब्ध करून देण्याची मागणी केली हाेती. त्याची दखल घेत मुद्रांक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.