मंगळवारी अध्यादेश, बुधवारपासून कर्जमाफीचा लाभ - भाऊसाहेब फुंडकर
By admin | Published: June 27, 2017 01:59 PM2017-06-27T13:59:27+5:302017-06-27T14:18:17+5:30
बुधवारपासून शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार,असल्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले.
बुलडाणा : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मंगळवारी कर्जमाफीचा
अध्यादेश निघणार असून, बुधवारपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार,
असल्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले. कर्जमाफी
झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेल्या भाऊसाहेबांचा ठिकठिकाणी सत्कार
करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर
कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर पहिल्यांदाच जिल्ह्यात आले. त्यामुळे त्यांचा
विश्राम भवनात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने सत्कार
करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, विधानसभा अध्यक्ष
योगेंद्र गोडे, राज्य प्रवक्त्या श्वेता शालिनी, तालुकाध्यक्ष पवार यांची
उपस्थिती होती. यावेळी भाऊसाहेब म्हणाले, की देशातील सर्वात मोठी
कर्जमाफी भाजप सरकारने दिली आहे. यामुळे राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना
कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाने थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा दीड
लाख रूपये तर कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना २५ हजारांची मदत मिळणार आहे.
मंगळवारी याबाबत सर्व अध्यादेश बँक अधिकाऱ्यांना मिळणार असून, बुधवारपासून
कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल. शासन तूर खरेदीबाबत गंभीर असून,
जेवढ्या तुरीची नोंदणी झाली आहे, तेवढी तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे
फुंडकर यांनी सांगितले.