चिखलीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध ४0 कंपन्यांचा सहभाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:59 AM2018-02-21T01:59:59+5:302018-02-21T02:01:12+5:30

चिखली: जिल्हय़ातील  सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीसाठी भटकंती आणि शोधाशोध करण्याची आलेली वेळ पाहता, त्यांना चिखलीतच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नामाकिंत कंपन्यामध्ये रोजगार मिळविण्याची संधी श्री मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठान, चिखली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमताून उपलब्ध झाली आहे.

To organize massive employment rally in Chikhliya; Participation of various 40 companies | चिखलीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध ४0 कंपन्यांचा सहभाग 

चिखलीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध ४0 कंपन्यांचा सहभाग 

Next
ठळक मुद्देराजीव सातव यांची राहणार उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: जिल्हय़ातील  सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीसाठी भटकंती आणि शोधाशोध करण्याची आलेली वेळ पाहता, त्यांना चिखलीतच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नामाकिंत कंपन्यामध्ये रोजगार मिळविण्याची संधी श्री मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठान, चिखली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमताून उपलब्ध झाली आहे. 
स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात २२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार राजीव सातव यांच्या हस्ते होणार असून, यावेळी आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, संजय राठोड, युकाँ जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती ढोकणे, सेवा दल जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान,  मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अवसरमोल, तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, सुनील तायडे, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी आदी पदधिकार्‍यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला उत्पादन, बँकिंग, रिटेल, प्रशिक्षक, टेलीकॉम, विमा, सेवा उद्योग, कृषीविषयक, नर्सिंग, अँटोमोबाइल, याचबरोबर गार्ड, कामगार व बीपीओ, केपीओ, क्षेत्रातातील सुमारे ४0 कंपन्यांद्वारे पाचवी ते पदवीधर असलेल्या १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार असून, कंपनीचे प्रतिनिधी पात्र उमेदरांची मुलाखतीद्वारे निवड करणार आहेत. यासाठी नोंदणी विनामूल्य असून, मेळाव्याच्या ठिकाणीसुद्धा नोंदणी करण्यात येणार आहे.  याचा लाभ सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. राहुल बोंद्रे, श्री मुंगसाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने यांनी केले आहे. 

Web Title: To organize massive employment rally in Chikhliya; Participation of various 40 companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.