अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:35 AM2021-07-28T04:35:46+5:302021-07-28T04:35:46+5:30
बुलडाणा : केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा ...
बुलडाणा : केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धांसाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेऊन स्पर्धांसाठी पाठविले जातात.
राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय विभागात/ कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील असलेले कार्यालय/विभागामध्ये कार्यरत असलेले खेळाडू/कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास सदर बाब आणून टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलिबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टिंग, पावरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉनटेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय भारतीय नागरी सेवा स्पर्धेतून ज्या खेळाडू/कर्मचाऱ्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२१ पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी जांभरून रोड, बुलडाणा येथे संपर्क साधावा तसेच विहीत नमुन्यातील आवेदनपत्र प्राप्त करून घेऊन १० नाेव्हेंबरपर्यंत आवेदन पत्र सुअक्षरात भरून, आपल्या कार्यालय प्रमुख/विभागप्रमुख यांच्या मान्यतेने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे तीन प्रतीत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.