शेतकरी मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:31 PM2017-08-17T23:31:08+5:302017-08-17T23:32:11+5:30
चिखली : राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश खबुतरे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश खबुतरे यांनी केले आहे.
जिल्हय़ाचे सुपुत्र ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथे १९ ऑगस्ट रोजी स्थानिक मौनीबाबा संस्थानमध्ये भव्य शेतकरी मेळावा, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सत्कार समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन भाजपा जिल्हा किसान आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, सत्कारमूर्ती म्हणून ना.भाऊसाहेब फुंडकर उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा माउली मुंडे तर प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, प्रदेश सरचिटणीस आ.संजय कुटे, प्रदेश उपाध्यक्ष आ.आकाश फुंडकर, जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेशआप्पा खबुतरे, भाजपा नेते सतीश गुप्ता, अँड.विजय कोठारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्वेता महाले, नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, शहराध्यक्ष सुरेंद्रप्रसाद पांडे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सद्यस्थितीत जिल्हय़ातील शेतकरी पावसाअभावी चिंचातुर झाला असून, अनेक समस्या त्यांच्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यांच्या या सर्व समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी व शेतकर्यांप्रती असलेले शासनाचे धोरण तसेच शासन शेतकर्यांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती राज्याचे कृषी मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे हे या मेळाव्यात देणार आहेत.
जिल्हय़ातील शेतकरी बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, तसेच ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या मेळाव्यानिमित्त आयोजित सत्कार सोहळा, वृक्षारोपण आदी कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि रक्तदान शिबिरात दात्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश खबुतरे यांनी केले आहे.