पत्रकार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:39+5:302021-01-08T05:52:39+5:30

बाळशास्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. ६ जानेवारी हा जांभेकर ...

Organizing lectures on the occasion of Press Day | पत्रकार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

पत्रकार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

Next

बाळशास्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. ६ जानेवारी हा जांभेकर यांचा जन्मदिन महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी ‘आजची पत्रकारिता व बातमी लेखन’ या विषयावर संपादक राजेश राजोरे यांचे व्याख्यान होणार आहे.

श्रीराम नगरी पतसंस्थेच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर चेके पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम नागरी पतसंस्थचे अध्यक्ष पंडितराव देशमुख उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानाचा पत्रकार बंधूनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उद्धव थुट्टे पाटील, सचिव अमोल जोशी, सांस्कृतिक विभाग प्रमुख पवनकुमार लढ्ढा, सदस्य विनोद खरे, बळीराम गुंजाळ, अमोल खेकाळे, काशीनाथ शेळके, आकाश डोणगावकर, तंझिम हुसेन, शिवदास जाधव, समीर शेख यांनी केले आहे.

Web Title: Organizing lectures on the occasion of Press Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.