निर्माल्य संकलन यात्रेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:26 AM2017-09-04T00:26:02+5:302017-09-04T00:29:17+5:30
शेगाव: येथील राष्ट्रचेतना सेवा प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलन यात्रा २0१७ चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार ५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी सदर निर्माल्य संकलन मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील जिजामाता चौक, जगदंबा चौक, एमएसईबी चौक, रेल्वे उड्डाण पुलाच्यावर व खाली, गांधी चौक, शिवनेरी चौक, जुने महादेव मंदिर, चौक, दसरानगर, हनुमान मंदिराजवळ, रोकडियानगर, राजगुरे यांच्या दुकानाजवळ आणि मुरारका चौक या ठिकाणी ४ व ५ रोजी निर्माल्य सर्मपण कुंडी ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरातील निर्माल्य सर्मपण कुंडीमध्ये टाकावे. आपल्याकडील फुले, हार, पाने, बेल दुर्वा, इत्यादी पूजा साहित्य यात सर्मपित करायचे आहे. ते गणेशमूर्तीच्या सोबत नदी, विहीर, तलावामध्ये फेकू नये. असे केल्यामुळे प्रदूषण व पाणी खराब होते. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.