ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:35 AM2021-04-07T04:35:15+5:302021-04-07T04:35:15+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ...
बुलडाणा : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन ५ ते ७ एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे.
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खासगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून १०० पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे.
या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील. पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिंग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आयटीआय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजना कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईनमधून ऑनलाईन अर्ज करुन सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून केले आहे.