शंकर बाबा जन्मोत्सवाचे आयाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:35 AM2021-01-25T04:35:40+5:302021-01-25T04:35:40+5:30
२६ जानेवारीला सकाळी काकडा आरती, दुपारी शोभायात्रा काढण्यात येणार असून रात्री ज्ञानेश्वर महाराज अपेगावकर यांचे कीर्तन, २७ जानेवारीला दुपारी ...
२६ जानेवारीला सकाळी काकडा आरती, दुपारी शोभायात्रा काढण्यात येणार असून रात्री ज्ञानेश्वर महाराज अपेगावकर यांचे कीर्तन, २७ जानेवारीला दुपारी त्रिवेणी देशमुख यांचे कीर्तन, २७ ला रात्री स्वामी हरिचैतन्य महाराज यांचे कीर्तन, २८ ला आचार्य आमृताश्रम स्वामी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तिन्ही दिवशी काकडा, भजन, विष्णू सहस्रनाम, गीतापाठ, हरिपाठ व जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व सतीश महाराज डोईफोडे हे करणार आहेत. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. प्रत्येकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच महोत्सवात दुकान लावण्यासाठी परवानगी मिळणार नाही, अशी माहिती संस्थानचे विश्वस्त मंडळ आणि उत्सव समितीने दिली आहे.