अनाथ मुलांना मिळणार आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:37 AM2021-05-20T04:37:16+5:302021-05-20T04:37:16+5:30
नायगाव दत्तापूर :- येथून जवळच असलेल्या साब्रा येथे अनाथ मुलांना प्राथमिक शिक्षण तसेच वारकरी संप्रदायाच्या मोफत शिक्षणाची व्यवस्था व्हावी, ...
नायगाव दत्तापूर :-
येथून जवळच असलेल्या साब्रा येथे
अनाथ मुलांना प्राथमिक शिक्षण तसेच वारकरी संप्रदायाच्या मोफत शिक्षणाची व्यवस्था व्हावी, या संकल्पनेतून अनाथाश्रमालयाचे उद्घाटन करण्यात आले.
पाेरके झालेल्या मुलांना मायेची व वात्सल्याची सावली देण्यासाठी साब्रा येथील महाराष्ट्र राज्य युवा वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सहदेव महाराज ठोकरे, श्रीखंडे राज वारकरी शिक्षण संस्था यांनी परिसर व मेहकर तालुक्यामधील काेराेना महामारीने, अपघात व आपत्तीने आई-वडिलांच्या छत्रापासून वंचित असलेल्या मुलांना भावी जीवन सुखसमृद्धीचे जगता यावे, याकरिता मोफत शिक्षण व वारकरी संप्रदाय शिक्षणाची, जेवणाची, गणवेशाची व मूलभूत गरजा पुरविण्यासाठी अनाथ विद्यालय व निवासी व्यवस्थेचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी सरपंच देवदास ठोकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला अभिमन्यू निकस, बंडू महाराज राऊत, किरण महाराज शिंदे, मंगेश महाराज वैद्य, मोहन ठोकरे, रामदास ठोकरे, दत्तात्रेय ठोकरे आदी गावकरी मंडळी उपस्थित होती.