..अन्यथा शासनाने परिणामाला तयार रहावे- चटप
By Admin | Published: August 31, 2016 01:16 AM2016-08-31T01:16:21+5:302016-08-31T01:16:21+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या लढय़ाचे शेगावातून फुंकले रणशिंग.
खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३0: स्वतंत्र विदर्भाच्या लढय़ाला ११८ वर्षांंंचा इतिहास आहे. शांततेच्या मार्गानेच विदर्भ राज्याची मागणी आतापर्यंंत होत आली आहे; मात्र शासनाने येत्या ३१ डिसेंबरपर्यंंंत याबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास, १ जानेवारीपासून तीव्र आंदोलनाच्या परिणामांना तयार रहावे, असा रोकठोक इशारा, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. अँड. वामनराव चटप यांनी येथे दिला.
खामगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या जागरासाठी शेगाव येथे ११ स प्टेंबर रोजी स्वतंत्र वर्हाड परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत सकाळी ११ वाजता नितीन रोंगे पावर प्रेझेंटेशनद्वारे विदर्भ राज्याची स्थिती, मेहकर येथील वसं त गिरी स्वतंत्र विदर्भ राज्याची लढाई यावर मार्गदर्शन करतील. तर अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अँड. वामनराव चटप, पोलीस महानिदेशक प्रवीण चक्रवती, रामभाऊ नेवले, अँड. नंदा पराते, डॉ. दीपक मुंढे, प्रदीप धामणकर, संध्या इंगोले, डॉ. रमेश गजबे, अरविंद देशमुख, अरुण केदार, अशोक राऊत मार्गदर्शन कर तील. ३१ डिसेंबरपर्यंंंत विदर्भ राज्याच्या जागरासाठी ५ दिंडी वेगवेगळ्या ठिकाणाहून काढण्यात येतील. या कालावधीत विदर्भ राज्याच्या बाबतीत शासनाने सकारात्मक भूमिका न जाहीर केल्यास, १ जानेवारीपासून उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही अँड. चटप यांनी यावेळी स्पष्ट केले.
खामगावसह आठ जिल्ह्याला पाठिंबा!
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आग्रही आहे. त्याचवेळी खामगाव जिल्ह्यासह राज्यातील काटेल, पुसद, अचलपूर, दक्षिण गडचिरोलीसह आठ जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी आपला पाठिंबा असल्याचेही विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड. वामनराव चटप यांनी स्पष्ट केले.