२२ हजारांपैकी केवळ ३ हजार शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:41 AM2020-06-23T11:41:46+5:302020-06-23T11:41:58+5:30

खामगाव तालुक्यातील पीक कर्ज वाटपाचे चित्र पाहता शुक्रवारपर्यंत २१९०६ पैकी ३३९६ शेतकºयांनाच वाटप झाले आहे.

Out of 22,000, only 3,000 farmers got crop loans | २२ हजारांपैकी केवळ ३ हजार शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज

२२ हजारांपैकी केवळ ३ हजार शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज

googlenewsNext

सदानंद सिरसाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खरिपातील पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असतानाच त्यासाठी बँकांकडून कर्जाच्या रूपात दिल्या जाणारा आर्थिक स्त्रोत मात्र थंडावला आहे. खामगाव तालुक्यातील पीक कर्ज वाटपाचे चित्र पाहता शुक्रवारपर्यंत २१९०६ पैकी ३३९६ शेतकºयांनाच वाटप झाले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी केवळ १५.५० आहे. राष्ट्रीयीकृत सोबतच विदर्भ कोकण, व्यापारी बँकांमध्येही पीक कर्ज वाटपाची गती कमालीची संथ आहे.
महायुतीच्या शासनानंतर महाआघाडीच्या शासनानेही कर्जमाफी दिली. त्यामध्ये कर्जमुदतीच्या कालावधीत बदल केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र ठरले. त्या पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या खात्यांचे प्रमाणीकरण कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये अडकले. त्यामुळे ५० टक्क्यांपेक्षाही अधिक शेतकºयांच्या खात्याचे प्रमाणीकरण न झाल्याने कर्ज मिळणे दुरापास्त झाले. त्यावर उपाय म्हणून प्रमाणीकरण रखडलेल्या शेतकºयांसाठी शासनाने सहकार विभागाकडून पीक कर्जाची हमी घेण्याचा उपाय योजला. सहकार विभागाकडून तसे हमीपत्र बँकांना दिले जात आहे, तरीही बँकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. परिणामी, पीक कर्ज वाटपाची गतीही मंदावली आहे.
विशेष म्हणजे, खामगाव शहरासह ग्रामीण भागात असलेल्या बँकांच्या शाखांना प्रत्येकी १२६६ शेतकरी खातेदारांना कर्जवाटप करण्याचा लक्षांक आहे. त्यापैकी अत्यंल्प शेतकºयांना वाटप झाले आहे.


शासनाने शेतकºयांना पीक कर्ज न देता त्यांना सावकाराच्या दारात पाठवण्याचा दळभद्रीपणा केला आहे. जिल्ह्यात केवळ १५ टक्के वाटप असणे, ही शोकांतिका आहे. सरकार शेतकºयांना सुखी ठेवू शकत नसेल तर कोणालाही सुखी करू शकणार नाही, ही जाण ठेवावी, येत्या काही दिवसात शंभर टक्के पीक कर्ज वाटप व्हावे, यासाठी आक्रमकपणे पाठपुरावा करू.
- आकाश फुंडकर,
आमदार, खामगाव.

बँकाकडून शेतकºयांना कर्ज वाटप व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ३० जूनपर्यंत शंभर टक्के शेतकºयांना पीक कर्ज वाटप करावे, याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच संबंधितांशी सातत्याने संपर्क ठेवून आढावा घेतला जात आहे.
- ओ.एस.साळुंके, उपनिबंधक, सहकारी संस्था, खामगाव.

Web Title: Out of 22,000, only 3,000 farmers got crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.