शाळा बाह्य विद्यार्थी शाेध माेहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:23+5:302021-06-19T04:23:23+5:30

एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी गाव, वस्ती वाडा, वीटभट्टी, हाॅटेल या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहा ...

Out-of-school student hunting campaign begins | शाळा बाह्य विद्यार्थी शाेध माेहीम सुरू

शाळा बाह्य विद्यार्थी शाेध माेहीम सुरू

googlenewsNext

एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी गाव, वस्ती वाडा, वीटभट्टी, हाॅटेल या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहा ते १४ वर्षे वयोगटांतील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे. त्याचे नाव शाळेत दाखल झाले पाहिजे. यासाठी राज्यभर शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील बोराखेडी येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन करत आहेत.

तसेच मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी शाळाबाह्य सर्वेक्षणासोबत नवीन वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थी प.नोंदणी सुरू केली आहे. आतापर्यंत ४५ विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल झाले आहेत. शाळाबाह्य विद्यार्थ्यांनाही वयानुसार शाळेत दाखल करून, शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षाचे नवीन शैक्षणिक सत्र हे २८ जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे पुढील नियोजनासाठी प. नोंदणी सर्वेक्षण करून इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश निश्चिती करण्यात येत आहे, तसेच आदर्श जि.प. शाळा बोराखेडी येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. या सर्वेक्षणासाठी मुख्याध्यापक अनिल चव्हाण, शिक्षिका अनुप्रिता व्याळेकर, सुनीता हुडेकर, वामिंद्रा गजभिये, सीमा गोरे आदी उपस्थित हाेत्या.

Web Title: Out-of-school student hunting campaign begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.