काेराेनाचा उद्रेक; ३५०पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:36+5:302021-02-23T04:52:36+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्ण माेठ्या प्रमाणात वाढत आहेत. साेमवारी जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक हाेऊन तब्बल ३५० ...

Outbreak of carina; 350 positive | काेराेनाचा उद्रेक; ३५०पॉझिटिव्ह

काेराेनाचा उद्रेक; ३५०पॉझिटिव्ह

Next

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्ण माेठ्या प्रमाणात वाढत आहेत. साेमवारी जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक हाेऊन तब्बल ३५० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच १०९८ अहवाल निगेटिव्ह असून, ९६ जणांनी काेराेनावर मात केली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खामगाव शहरातील २१ , खामगाव तालुका माक्ता १, नांदुरा शहर १९, नांदुरा तालुका : वाडी १, निमखेड १, टाकरखेड १, बुलडाणा शहर ५१, बुलडाणा तालुका केसापूर १, भादोला १, तराडखेड १, दहीद बु १, माळवंडी १, सागवन ५, सुंदरखेड २, गिरडा २, टाकळी १, मेहकर शहर १, मेहकर तालुका थार १, डोणगाव २, जानेफळ २, बऱ्हाई २, कुंबेफळ १, दे. राजा तालुका अंढेरा १०, आळंद २, सिनगाव जहागीर १८, भिवगण ८, दे. राजा शहर ४०, सिं. राजा शहर २, सिं. राजा तालुका चिंचोली १, पिंपळखुटा २, दुसरबीड १, चिखली शहर ३३, चिखली तालुका टाकरखेड १, अंचरवाडी १, ईसोली १, पिंपळवाडी ३, हातणी ३, वळती १, अंत्री कोळी ४, जांभोरा ३, गुंज १, मंगरूळ नवघरे ५, केळवद २, धोत्रा भणगोजी २, सवणा ३, पेठ १, तेल्हारा २, पिंपळगाव सोनाळा २, मालखेड १, गजरखेड १, भोरसा भोरसी १, मलकापूर शहर ३७, मलकापूर तालुका पिंपळखुटा १, लासुरा २, जांबुळ धाबा १, कुंड बु २, जळगाव जामोद शहर ०४, जळगाव जामोद तालुका : झाडेगाव ५, मोताळा शहर ७, मोताळा तालुका तळणी १, लोणार तालुका पिंपळनेर १, हिरडव १, लोणार शहर १०, मूळ पत्ता कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव १, मेरखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना १, जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना १, डोलखेडा जि. जालना येथील एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

तसेच काेराेनावर मात केल्याने खामगाव येथील ४ , बुलडाणा सिद्धिविनायक कोविड हॉस्पिटल २, अपंग विद्यालय २४, स्त्री रुग्णालय ३, दे. राजा : ९, चिखली १५, लोणार ४, शेगाव १७, जळगाव जामोद ३, मलकापूर ५, मेहकर ९, नांदुरा येथील एकाने काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

१८७ जणांचा मृत्यू

आज रोजी ३ हजार ३३० नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १ लाख २१ हजार ५२९ आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण १६ हजार ४९६ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १४ हजार ६८६ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात १ हजार ६२३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १८७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Outbreak of carina; 350 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.