सिंदखेडराजा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:32 AM2021-03-08T04:32:33+5:302021-03-08T04:32:33+5:30
तालुक्यात सध्या ६४ तर शहरात ७३ रुग्ण उपचार घेत आहेत. मध्यंतरी बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात ...
तालुक्यात सध्या ६४ तर शहरात ७३ रुग्ण उपचार घेत आहेत.
मध्यंतरी बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तेथे २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्या पासून आजपर्यंत येथे १३ हजारांपेक्षा जास्त तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यातून १ हजार ८० रुग्ण पॉझिटिव्ह होते. सध्या तालुक्यातील आंचली तीन, वाघोरा, आडगाव राजा, जळगाव, रम्हणा, वाघजाई, ताड शिवणी येथे प्रत्येकी एक रूग्ण आहे. पांगरी उगले तीन, किनगाव राजा तीन, शेलगाव राऊत दोन, दुसरबीड १३, लिंगा एक, साखरखेर्डा १४, सवडद एक, रताळी सात, शेंदुर्जन सहा, शिंदी येथे पाच रुग्ण असून १३७ पैकी ११६ गृह विलगीकरणात आहेत.
दरम्यान, रुग्ण वाढत असताना नागरिक मात्र गंभीर नसल्याचे चित्र आहे.
गर्दी कायम
महत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडण्याच्या प्रशासनाच्या सूचना असतानाही लोक शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. सकाळी नऊ ते दुपारी पाच वाजेपर्यंत शहरातील दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश असल्याने ग्रामीण भागातील लोक बाजारात गर्दी करीत आहेत. सध्या लग्नसराई असल्याने कपडे, किराणा, सोने खरेदीसाठी ग्रामीण भागातून लोक शहरात येत आहेत. वाढत्या गर्दीला आळा बसला नाही, तर रुग्णसंख्या वाढण्याची धोका आहे.