मुगावर लिफ क्रिनकल विषाणूचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:20 AM2021-07-24T04:20:55+5:302021-07-24T04:20:55+5:30
नदीचे प्रदूषण वाढले बुलडाणा : येथील पैनगंगा नदीपात्रामध्ये काही ठिकाणी कचरा व सोडपाणी सोडण्यात येते. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत ...
नदीचे प्रदूषण वाढले
बुलडाणा : येथील पैनगंगा नदीपात्रामध्ये काही ठिकाणी कचरा व सोडपाणी सोडण्यात येते. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे. मेहकर शहरातील सांडपाणीही या नदीत जाते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मुरुमाच्या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष
बुलडाणा : रेती उत्खननावर महसूल प्रशासन सर्वत्र लक्ष ठेवून असते. परंतु यात मुरुमाच्या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. सध्या शहर परिसरात मुरुमाचे अवैध उत्खनन वाढले असून, मनमानी भावाने मुरुमाची विक्री केली जात आहे.
लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत १ लाख ७७ हजार ५७९ लाभार्थ्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
अभ्यासासाठी मोबाइल दान देण्याची गरज
मोताळा : ऑनलाइन शिक्षणासाठी अनेकांकडे मोबाइल नाहीत. त्यामुळे गाेरगरीब व गरजवंत मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल दान देण्यात यावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.