ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:10+5:302021-05-29T04:26:10+5:30
रोजी कोरोनाची ही परिस्थिती नियंत्रणात आली आहे. उमरा देशमुख येथील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात यश आले आहे. गावावर मोठे ...
रोजी कोरोनाची ही परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
उमरा देशमुख येथील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात यश आले आहे. गावावर मोठे संकट आले होते; परंतु प्रत्येकाने खबरदारी घेत नियमांचे पालन केले. त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
लता मिलिंद खंडारे, सरपंच, उमरा देशमुख.
उमरा देशमुख गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सर्व रुग्णांची अत्यंत चांगली आहे; परंतु अद्यापही नागरिकांनी कोरोना त्रीसूत्रीचे पालन केले पाहिजे.
दीपक काळे, ग्रामसेवक, उमरा देशमुख.
आठ तालुके २० च्या खाली
गेल्या आठवड्यामध्ये एका तालुक्यात दिवसाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे ५० च्यावर होते. आता हे प्रमाण अत्यंत खाली आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये तर दिवसाला सापडणारी रुग्णसंख्या २० च्या खाली आली आहे. यामध्ये शेगाव, देऊळगाव राजा, चिखली, मलकापूर, नांदुरा, लोणार, मोताळा, सिंदखेड राजा या तालुक्यात शुक्रवारी २० पेक्षा कमी रुग्ण सापडले.