सात दिवसात १०० काेराेना रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:40 AM2021-02-17T04:40:53+5:302021-02-17T04:40:53+5:30
चिखली : शहरात डिसेंबर महिन्यात नियंत्रणात असलेला काेराेना दुसऱ्या आठवड्यात माेेठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात सात दिवसात १११ नव्या ...
चिखली : शहरात डिसेंबर महिन्यात नियंत्रणात असलेला काेराेना दुसऱ्या आठवड्यात माेेठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात सात दिवसात १११ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
चिखली शहरात डिसेंबरमध्ये कोरोना आटोक्यात आला होता. रुग्णांची संख्या देखील कमी झाल्यामुळे येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील काेविड रुग्णालय बंद करण्यात आले होते. परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात काेराेनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचे निर्बंध बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्याचाच फायदा नागरिक घेत असून गर्दीच्या ठिकाणी, बँकेत, शासकीय कार्यालयात मास्क वापरत नाहीत. त्याचप्रमाणे सामाजिक व शारीरिक अंतरदेखील पाळले जात नाही. नागरिकांना कुणाचा धाक राहायलाच नाही. लग्न समारंभ कार्यक्रम, राजकीय कार्यक्रमात माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे. शासकीय कार्यालयात देखील गर्दी होत असून तेथे प्रवेश नाही असे फक्त फलक लावण्यात आले आहेत. शासकीय कर्मचारी देखील गळ्यात मास्क लटकवत असल्याचे आढळून येतात. शासकीय कार्यालयात देखील मास्क वापरण्याची सर्व नागरिकांना सक्ती करण्यात येत नाही.शहरातील अनेक तरुण काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. पूर्वी काेराेनावर शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते; परंतु आता खासगी रुग्णालयात देखील काेराेना रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य विभागात नोंद होत नाही त्यामुळे प्रत्यक्षात काेराेना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण न आल्यास आरोग्य विभागाकडून पुन्हा निर्बंध घालावे लागतील,असा इशारा चिखली मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुहास तायडे यांनी दिला आहे.
असे वाढले काेराेना रुग्ण
१० फेब्रुवारी ०६
११ फेब्रुवारी १२
१२ फेब्रुवारी १८
१३ फेब्रुवारी १४
१४ फेब्रुवारी २७
१५ फेब्रुवारी २३
१६ फेब्रुवारी ११