अडचणींवर मात करून पाणीटंचाई दूर करा!

By admin | Published: March 28, 2016 02:05 AM2016-03-28T02:05:34+5:302016-03-28T02:05:34+5:30

शेगाव पंचायत समितीची वार्षिक आमसभा; फुंडकर यांचे अधिका-यांना निर्देश.

Overcome water shortage by overcoming problems! | अडचणींवर मात करून पाणीटंचाई दूर करा!

अडचणींवर मात करून पाणीटंचाई दूर करा!

Next

शेगाव: तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. किरकोळ कारणांनी ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांनी अडचणींवर मात करून प्राधान्यक्रमाने पाणीटंचाई दूर करावी, असे निर्देश आ.अँड. आकाश फुंडकर यांनी दिले. शेगाव पंचायत समितीची वार्षिक आमसभा दोन वेळा रद्द केल्यानंतर तिसर्‍यांदा रविवारी पार पडली. या आमसभेत अध्यक्षीय भाषणात आ. फुंडकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्या अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपताच प्रत्येक गावाला भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. एमआरजीएसची कामे मजूर मिळत नसल्याने प्रलंबित आहेत. यासाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन प्रत्येक गावात किमान १00 जॉबकार्ड तयार करावे, जेणेकरून तालुक्यात मजुरांना मजुरी मिळेल व विकासकामे सुरू होतील. शेगाव पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकार्‍याचे पद रद्द होत असल्याबाबतचा विषय आपण उद्याच ग्रामविकास मंत्री यांच्यासमोर मांडून निकाली काढू, असेही ते म्हणाले. आमसभेत झालेले निर्णय व सूचनांवर अधिकार्‍यांनी गांभीर्याने कार्यवाही करावी, अन्यथा कारवाई करण्याची पाळी येऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Overcome water shortage by overcoming problems!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.