जिल्ह्यातील ११७३ बाधितांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:57 AM2021-05-05T04:57:13+5:302021-05-05T04:57:13+5:30
दुसरीकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३,५६० संदिग्धांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २२८१ ...
दुसरीकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३,५६० संदिग्धांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २२८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात १२०, खामगाव तालुक्यात १६१, शेगावमध्ये ७०, देऊळगाव राजा ३१, चिखली २८, मेहकर ८०, मलकापूर ६७, नांदुरा ६३, लोणार १०३, मोताळा १११, जळगाव जामोद १५, सिंदखेड राजा २६, संग्रामपूर तालुक्यात ४ जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले.
मंगळवारी उपचारादरम्यान सातजणांना मृत्यू झाला. यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथील ७० वर्षीय महिला, बुलडाणा येथील ७१ वर्षीय व्यक्ती, खामगावातील सिंधी कॉलनीमधील ४७ वर्षीय महिला, हिरा नगरमधील ८० वर्षीय व्यक्ती, पाटकपुरा भागातील ४० वर्षीय व्यक्ती आणि खामगाव तालुक्यातील जनुना येथील ३४ वर्षीय व्यक्ती, तर शेगाव तालुक्यातील मोदी नगरमधील ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ११७३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
--३,६७,१६८ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह--
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ६७ हजार १६८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ६० हजार ९३८ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मंगळवारी ६,२१७ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत ४३४ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.