स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिमारा ठरतोय कोरोना रुग्णांना घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:56+5:302021-05-05T04:56:56+5:30
--बुरशीजन्य आजाराचाही धोका-- स्टेरॉईडचा अवाजवी वापर हा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. प्रामुख्याने माणसाची प्रतिकार शक्ती क्षीण होते. किडनी व ...
--बुरशीजन्य आजाराचाही धोका--
स्टेरॉईडचा अवाजवी वापर हा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. प्रामुख्याने माणसाची प्रतिकार शक्ती क्षीण होते. किडनी व लिव्हरवर विपरीत परिणाम होतो.
बुरशीजन्य आजारही होता. स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढू शकते. त्यातून मग आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सांगितले.
-- सीटी स्कॅनमुळे एक्सरेच्या ३५० पट रेडिएशन--
सीटी स्कॅनच्या वेळी रेडिएशनचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो. एक्सरेच्या तुलनेत ३५० पट रेडिएशन होते. एक्सरेवेळी ०.०२ एमएसव्ही (मिमी सिव्हर्टस) रेडिएशन निघते, तर सीसी स्कॅन दरम्यान ७ एमएसव्ही निघते. त्यामुळे सीटी स्कॅनचा अतिमारा हा धोकादायक ठरतो. तसेच यामुळे स्किनचेही आजार होऊ शकतात.
--बुलडाण्यात दररोज ७० ते ९० सीटी स्कॅन--
बुलडाणा शहरात दररोज ७० ते ९० सीटी स्कॅन होत आहेत. जिल्ह्यात एक हजाराच्या आसपास सीटी स्कॅन होत असल्याचा अंदाज या क्षेत्रातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
---
कोरोना संसर्गाची व्याप्ती समजण्यास सीटी स्कॅन महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सीटी स्कॅन करावा. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर किमान पाच ते सात दिवसांनी साधारणत: सीटी स्कॅन करावा लागतो. त्यामुळे तो न झाल्यास घाबरू नये. वारंवार सीटी स्कॅन केल्यास रेडिएशनमुळे रक्ताचा कॅन्सर होण्याची भीती असते. प्रामुख्याने कोरोना संसर्गामुळे फुप्फुसाची नेमकी स्थिती काय? हे जाणून घेण्यासाठीच सीटी स्कॅन करावा लागतो. वारंवार सीटी स्कॅन केल्यास शरीरात रेडिएशन शोषले जाते.
(डॉ. संजय बोथरा, एमडी रेडिओलॉजिस्ट तथा सीटी स्कॅन तज्ज्ञ, बुलडाणा)