ऐतिहासिक तलावांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:47+5:302021-08-14T04:39:47+5:30
मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाकडे लक्ष बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष ...
मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाकडे लक्ष
बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्रांवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही, याची मतदारांनी खात्री करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मतदारांचे मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाकडे लक्ष लागलेले आहे.
तुरीचे शेंडे खुडल्यामुळे होतेय उत्पादनात वाढ
बुलडाणा : तुरीचे शेंडे खुडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या तुरीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. विजय रामराव सोळंकी (मु. कोलारा, ता. चिखली) यांनीसुद्धा शेंडे खुडल्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचा त्यांना अनुभव आहे. शेंडे खुडण्यापूर्वी उत्पादन एकरी पाच क्विंटल होते. परंतु शेंडे खुडणी केल्यामुळे त्यांचे एकरी उत्पादन सात क्विंटलपर्यंत वाढले.
एकलव्य निवासी शाळेतील प्रवेश प्रक्रिया सुरू
बुलडाणा : २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यान्वित इंग्रजी माध्यमाच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूलमधील इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या शाळा प्रवेशासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन आदिवासी विभागातर्फे करण्यात आले आहे. एकलव्य निवासी शाळेतील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.