आॅनलाइन कर्जमाफीच्या अजार्साठी रात्रभर जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 08:06 PM2017-09-12T20:06:12+5:302017-09-12T20:06:12+5:30
मोताळा: आॅनलाइन कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दिवसा सर्व्हर डाउन राहत असल्यामुळे मोताळा शहरात शेतकºयांना रात्रभर जागरण करावे लागत आहे.
शंकर तेलंग
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा: आॅनलाइन कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दिवसा सर्व्हर डाउन राहत असल्यामुळे मोताळा शहरात शेतकºयांना रात्रभर जागरण करावे लागत आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने कर्जमाफीसाठी सुरु करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २००९ ते ३० जुन २०१६ पर्यत कर्ज घेतले आहे. अश्या शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज आॅनलाइन भरून द्यायचे आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी पती-पत्नी दोघाच्या अंगठयाचे ठसे द्यावे लागतात. त्यानंतर सबंधित अर्ज वेबसाइटवर आॅनलाइन अपलोड होतो. परंतु वेबसाइड दिवसा मोठ्या प्रमाणात बंद असते. त्यामुळे शेतकरी रात्री ई - सेवा केंद्रापुढे गर्दी करीत आहेत. यामुळे कर्जमाफीचे अर्ज आॅनलाइन भरण्यासाठी पुर्ण रात्र जागरण करुण काढावी लागत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दिवसा शेतात काम करुण थकलेला शेतकरी आता अर्ज भरण्यासाठी रात्र जागुन काढत आहे. हे अर्ज भरण्यासाठी वयोवृद्ध शेतकºयांना रात्रभर जागत काढावी लागत आहे. ज्या शेतकºयांची पत्नी त्यांच्यासोबत राहत नाहीत किंवा घटस्फोट झााला आहे, असे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.