जिल्ह्यातील ५९ रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:01+5:302021-05-01T04:33:01+5:30

बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने शासकीय व खासगी अशा मिळून ५९ रुग्णालयांमध्ये कोविड बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ...

Oxygen audit of 59 hospitals in the district | जिल्ह्यातील ५९ रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट

जिल्ह्यातील ५९ रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट

Next

बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने शासकीय व खासगी अशा मिळून ५९ रुग्णालयांमध्ये कोविड बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. त्यात येत्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यास नेमका किती ऑक्सिजन लागले, तसेच ऑक्सिजनचा तुटवडा पाहता त्याची गळती व अपव्यय टाळण्यास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सोबतच दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिकोणातूनही ऑक्सिजन ऑडिट अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रामुख्याने वैद्यकीय आणि उभारणी प्रक्रियेतील कच्चे दुवे या दोन मुद्द्यांवर हे ऑडिट होत आहे.

यासाठी खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य एस. एस. प्रभुणे यांची नोडल अधिकारी तर या तंत्रनिकेतनमधील यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. ए. ई. ढोले यांची साहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच या हॉस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तीन सदस्यीय १२ पथके गठीत करण्यात आली असून प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन याबाबत ते पाहणी व तपासणी करत आहेत. चिखली तालुक्यातील जवळपास ९ खासगी कोविड रुग्णालयांची आतापर्यंत या पथकांनी पाहणी केली आहे. महाराष्ट्रदिनीसुद्धा यातील काही पथके ही मेहकर तालुक्यातील रुग्णालयांची तपासणी करून ऑक्सिजनसंदर्भात ऑडिट करणार आहेत.

--ही होणार तपासणी--

ऑक्सिजन पुरवठा करणारी पाईपलाईनची अपेक्षित दाब सहन करण्याची क्षमता आहे का?

कोठे गळती तर होत नाही ना?, वायुनलिकांची गळती असल्यास अथवा पुनर्बांधणीची गरज, खासगी रुग्णालयात तपासणीवेळी अशा बाबी आढळल्यास तातडीने अहवाल सादर करण्यात येणार आहे. यासोबतच ऑक्सिजन पुरवठा करणारी वायुनलिका कोणत्या धातू मिश्रणाची आहे, ती कधी बसविण्यात आली व त्याची मुदत कधी संपणार, या सर्व बाबींची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे.

--सोमवारी अंतिम अहवाल--

सध्या जिल्ह्यातील ५९ हॉस्पिटलचे हे ऑक्सिजन ऑडिट होत असून सोमवारी याचा अंतिम अहवाल हा जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. २७ एप्रिलपासून जिल्ह्यात या १२ पथकांद्वारे ऑक्सिजन ऑडिट करण्यात येत आहे.

--फायर सेफ्टीचीही पाहणी--

संबंधित रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिटही झाले आहे किंवा नाही, याचीही यावेळीच विचारणा करण्यात येत आहे. या रुग्णालयांपैकी काही रुग्णालयांनी फायर सेफ्टी ऑडिटचीही प्रक्रिया सुरू केली आहे. पालिकेच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. काही ठिकाणी याबाबत अडचणी असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: Oxygen audit of 59 hospitals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.