बुलडाणा जिल्ह्यात ऑक्सीजनची मागणी आली निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:58 PM2020-10-30T12:58:24+5:302020-10-30T12:58:32+5:30
Buldhana News ऑक्सीजनची मागणी तथा वापर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत निम्म्यावर आल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कोराना बाधीत रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सीजनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणाच तणावाखाली आली होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात ऑक्सीजनची मागणी तथा वापर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत निम्म्यावर आल्याचे एकंदरीत चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
त्यामुळे वर्तमान स्थितीत १.५ मेट्रीक टन ऑक्सीजन नियमित स्वरुपात जिल्ह्यात उपलब्ध होत आहे. दुसरीकडे प्रारंभी जिल्ह्यात दररोज जेथे ११० ते १२० दरम्यान ऑक्सीनज सिलींडरची बुलडाण्यातील कोवीड समर्पीत रुग्णालयात गरज लागत होती. तेथे आजच्या घडीला केवळ ६४ ऑक्सीजन सिलींडर लागत आहे. त्यामुळे ऑक्सीजनचा जिल्ह्यातील तुटवडा संपुष्टात आला आहे. यायाच अर्थ जिल्ह्यात कारोना बाधीत असलेले तथा गंभीर असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात १२२ कोरोना बाधीतांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून १.३० टक्क्यांच्या आस हे कोरोना बाधीतांचा मृत्यू होण्याचे प्रमाण आहे. गेल्या एक महिन्यापासून ये १.३० ते १.५० टक्क्यांच्या आसपास स्थिर असल्याचे निदर्शनास आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा युद्ध पातळीवर अैारंगाबाद येथून बुलडाणा जिल्ह्यासाठी ऑक्सीजन सिलींडर मागविण्यात आले होते. ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याने थेट अन्न व अैाषध प्रशासन विभगास यात हस्तक्षेप करावा लागला होता.
३५ रेडेसिवीर इंजेक्शनची दररोज गरज
रेमडेसिवीर इंजेक्शनची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी कोवीड समर्पीत रुग्णालयातील एका कक्ष सेवकाला बडतर्फ करण्यात आल्यानंतर हे इंजेक्शनही जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, यादृष्टीने आरोग्य विभागासोबतच अन्न व अैाषध प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर वर्तमान स्थितीत जिल्ह्यात १,१४५ इंजेक्शन जिल्ह्यात उपलब्ध असून समर्पीत कोवीड रुग्णालयात १०२४ पर्यंत त्यांची संख्या आहे. बुलडाणा जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत प्रतिदिन ३५ रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज भासते. गेल्या दोन दिवसापूर्वीतर हे प्रमाण शुन्यावर होते, असे अन्न व अैाषध प्रशासन विभागातील सुत्रांनी सांगितले.