मेहकरात ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:16+5:302021-05-18T04:36:16+5:30
मेहकर तालुक्यात काेराेनाचा उद्रेक झाला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून ऑक्सिजन जनरेशन प्लांट आमदार डॉ.संजय रायमुलकर ...
मेहकर तालुक्यात काेराेनाचा उद्रेक झाला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून ऑक्सिजन जनरेशन प्लांट आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मेहकर ग्रामीण रुग्णालय येथे उभारण्यात येत आहे. तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागामध्ये आढळत आहेत. रुग्णांना ऑक्सिजनची अतोनात गरज असताना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही. खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जाते. शासन आपल्या स्तरावर रुग्णांची गैरसोय होणार नाही याची तयारी करत आहे. १७ मे रोजी मेहकर ग्रामीण रुग्णालयात आमदार संजय रायमुलकर, तहसीलदार संजय गरकळ, उपविभागीय अभियंता शरद म्हस्के, बांधकाम अभियंता गुलाबराव शेळके, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम ठोबरे, राजू डोंगरदिवे, स्वीय सहाय्यक रूपेश गणात्रा यांनी जागा निश्चित करून १८ मेपासून ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या कामाला सुरुवात होणार आहे. १५ दिवसामध्ये काम पूर्ण होऊन ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू होणार आहे.