ऑक्सिजन जनरेशन प्लांट लवकरच होणार कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:36 AM2021-04-22T04:36:04+5:302021-04-22T04:36:04+5:30
या ऑक्सिजन प्लॅान्टचे साहित्य व उपकरणे गेऊन एक वाहन २१ एप्रिल रोजी बुलडाण्यात दाखल झाले आहे. त्यासंदर्भाने जिल्हा शल्यचिकित्सक ...
या ऑक्सिजन प्लॅान्टचे साहित्य व उपकरणे गेऊन एक वाहन २१ एप्रिल रोजी बुलडाण्यात दाखल झाले आहे. त्यासंदर्भाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांना विचारणा केली असता त्यांनी त्यास दुजोरा दिला. सोबतच या प्लान्टद्वारे ८० जम्बो सिलींडर भरता येतील एवढी या प्लान्टची क्षमता असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारकडून हे संयत्र मिळाले असून येत्या पाच दिवसात प्रत्यक्षात हा प्लान्ट कार्यान्वित होईल. या व्यतिरिक्त खामगाव, मलकापूर, देऊळगाव राजा येथेही असे प्लान्ट लवकरच कार्यान्वित होतील, असे ते म्हणाले.
--महिन्याची गरज ३९५ मेट्रिक टन--
बुलडाणा जिल्ह्याची ऑक्सिजनची महिन्याची गरज ही ३९५ मेट्रिक टन आहे. दिवसाला खासगी व सरकारी रुग्णालये मिळून १२.७३ मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील हे चारही प्लान्ट कार्यान्वित झाल्यास जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत बऱ्यापैकी स्वयंपूर्ण बनण्यास मदत होणार आहे.