जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:35 AM2021-04-16T04:35:19+5:302021-04-16T04:35:19+5:30

गेल्या तीन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हापासून ऑक्सिजन उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू होते. आता मात्र परिस्थिती अधिक ...

Oxygen shortage in the district | जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा

जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा

Next

गेल्या तीन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हापासून ऑक्सिजन उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू होते. आता मात्र परिस्थिती अधिक बिकट बनत असून बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयामध्ये जिल्ह्यातील ८० टक्के गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे येथे ऑक्सिजनची सध्या नितांत अवश्यकता निर्माण झाली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनीही यास दुजोरा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यात तांत्रिक अडचणी बऱ्याच आहेत.

कोविड समर्पित रुग्णालयामध्ये २० केएलचा लिक्वीड ऑक्सिजन प्लॅन्ट असून त्यात किमान एक दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा सध्या उपलब्ध आहे. दुसरीकडे कोविड समर्पित रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपण लिक्वीड ऑक्सिजनची मागणी केली असून १६ एप्रिल रोजी दुपारपर्यंत किमान १० केएल लिक्वीड ऑक्सिजन उपलब्ध होईल. सोबतच आपत्कालीन स्थितीसाठीही मर्यादित स्वरूपात आपण तयार आहोत.

एफडीएमार्फतही मागणी

येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातूनही मुंबई येथील एफडीएच्या नियंत्रण कक्षाकडे १२.७३ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी करण्यात आली आहे. यासाठी एफडीएकडूनही सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच एफडीएचे एक अधिकारी आजारी असल्याने एफडीएच्या बुलडाणा येथील कार्यालयावरही मोठा ताण आलेला आहे.

दररोजची गरज १२.७३ मेट्रिक टन

बुलडाणा जिल्ह्याची दररोजची गरज ही १२.७३ मेट्रिक टन आहे. त्यानुषंगाने कोविड समर्पित रुग्णालयाकडून अनुषंगिक मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात खासगी रुग्णालयांसाठीही येथूनच ऑक्सिजन देण्यात येतो. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर ऑक्सिजन उपलब्धतेचा मोठा ताण आलेला आहे. मात्र जमेची बाजू म्हणजे १६ एप्रिल रोजी दुपारपर्यंत जिल्ह्याला प्रसंगी १० केएल लिक्वीड ऑक्सिजन उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास आगामी पाच ते सात दिवसांचा प्रश्न सुटेल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Oxygen shortage in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.