बुलडाणा जिल्ह्यात तिपटीने वाढला ऑक्सीनजचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:18 AM2020-08-26T11:18:15+5:302020-08-26T11:18:23+5:30
रुग्णांची संख्या १०० च्या टप्प्यात आल्याने जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरवठा पुर्वीच्या तुलनेत तिपटीने वाढला आहे.
बुलडाणा: कोवीड-१९ रुग्णांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून ऑक्सीजनवरील रुग्णांची संख्या १०० च्या टप्प्यात आल्याने जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरवठा पुर्वीच्या तुलनेत तिपटीने वाढला आहे. एकट्या बुलडाणा येथील कोवीड सर्मित रुग्णालयामध्ये सरासरी ३८ रुग्ण हे ऑक्सीजनवर असून आगामी काळात जिल्ह्यात आॅक्सीजनची मागणी आणखी वाढणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.
कोवीड-१९ ची बाधा झालेल्या रुग्णांसाठी प्रतिबंधात्कम उपाययोजनांसोबतच आॅक्सीजन पुरवठा हा महत्त्वाचा उपाय असून रुग्ण बरा होण्यास त्याची भूमिका महत्त्वाची आहे. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सीजन पातळी ही कायम राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. ती कमी झाल्यास रुग्णाच्या फुफ्फुसावर परिणाम करते व रुग्णाच्या व्याधीत वाढ होते. त्यामुळे प्राधान्याने रुग्णांना ऑक्सीजन दिल्या जात असून त्यामुळेच ऑक्सीजनची मागणी वाढली आहे. एकट्या बुलडाणा येथील कोवीड सर्मित रुग्णालयामध्ये दररोज १०० आॅक्सीजन सिलींडर लागत आहेत. दरम्यान, बुलडाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर आणि देऊळगाव राजा येथे ऑक्सीजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या बुलडाणा आणि खामगाव येथे आॅक्सीजनवर असलेल्या रुग्णांची संख्या ही १०० च्या टप्प्यात आली आहे.
लिक्वीड ऑक्सीजन टँक उभारणार
कोवीड रुग्णांना त्वरित आॅक्सीजन उपलब्ध व्हावा, या दृष्टीकोणातून सीएसआर फंडातून बुलडाणा येथील रुग्णालयात लिक्वीड आॅक्सीजन टँक उभारण्यात येणार आहे. ओएनजीसीसह अन्य काही कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस. यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रत्येक जिल्हास्तरावर लिक्वीड ऑक्सीजन टँक उभारण्यात यावा, असे निर्देश राज्य शासनाने दिले असल्याची माहिती आहे.
दररोड दीडशे ऑक्सीजन सिलींरची गरज
जिल्ह्यात सध्या दररोज दीडशे ऑक्सीजन सिलींडरची गरज असून त्याच्या अनुपातात काही सिलींडर राखीव ठेवावे लागत आहे. जेणे करून ऑक्सीजनचा तुडवडा भासणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. शेगाव येथील रुग्णालयात तुर्तास ऑक्सीजनवरील रुग्ण नाही तर मलकापूर व देऊळगाव राजा येथेही आता ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले.