पाणी पुरवठा अभियंत्यांवर गैरवर्तनाचा ठपका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:50 AM2017-07-27T01:50:51+5:302017-07-27T01:50:51+5:30

मलकापूर : पाणी पुरवठा अभियंता अमित कोलते यांचेवर गैरवर्तनाचा ठपका ठेवीत यासंदर्भातील प्रस्ताव २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांचेकडे पाठविण्यात आला.

paanai-pauravathaa-abhaiyantayaanvara-gaairavaratanaacaa-thapakaa | पाणी पुरवठा अभियंत्यांवर गैरवर्तनाचा ठपका !

पाणी पुरवठा अभियंत्यांवर गैरवर्तनाचा ठपका !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : पाणी पुरवठा अभियंता अमित कोलते यांचेवर गैरवर्तनाचा ठपका ठेवीत यासंदर्भातील प्रस्ताव २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांचेकडे पाठविण्यात आला. तर प्रभारी अतिक्रमण प्रमुख व्ही.आर. राठोड यांच्या बेजबाबदार वागणुकीविरूध्द निलंबनाची कार्यवाही का करण्यात येवू नये अशी कारणे दाखवा नोटीस राठोड यांना नगर परिषद मुख्याधिकारी यांनी बजावल्याने २६ जुलै रोजी नगर परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले.
हातपंपाच्या वाढत्या तक्रारी पाहता पाणी पुरवठा अभियंता अमित कोलते यांना पाणी पुरवठा सभापती अनिल गांधी यांनी भ्रमणध्वनीव्दारे वारंवार अवगत करूनही ते चमुतील कर्मचाºयांना मोकळे करीत नाही. उलटपक्षी अतिरिक्त माणसांची मागणी करतात. त्याचप्रमाणे ते पदाधिकाºयांशी गैरवर्तनाने वागतात. पाणी पुरवठा सभापती अनिल गांधी यांनी एका लेखी पत्राव्दारे नगराध्यक्ष अ‍ॅड.रावळ यांच्या निदर्शनात आणून दिली.

Web Title: paanai-pauravathaa-abhaiyantayaanvara-gaairavaratanaacaa-thapakaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.