जिल्हा सीमेवर पाेलीस बंदाेबस्त वाढवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:33+5:302021-04-29T04:26:33+5:30
जिल्हा सीमांवर पथके तैनात करण्यात आली असून त्यामध्ये दोन पोलिस आणि दोन शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. अत्यावश्यक ...
जिल्हा सीमांवर पथके तैनात करण्यात आली असून त्यामध्ये दोन पोलिस आणि दोन शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशाची जिल्ह्याच्या सीमेवर थर्मल स्कॅनिंग तपासणी आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या आहेत. त्या सूचनेचे पालन करत तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील धामणगाव बढे पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या बुलडाणा व जळगाव खान्देश जिल्ह्याच्या सीमेवर आडमार्गाने इतर जिल्ह्यातून प्रवास करून कोणीही विना तपासणी जिल्ह्यात दाखल होऊ नये, तसेच आपल्या जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती हा विना तपासणी करून शेजारी जिल्ह्यात या आडमार्गाने जाऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर नेमून दिलेले पथक जिल्ह्याच्या सीमेवर अचूकपणे कर्तव्य बजावत आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार समाधान सोनवणे यांनी धामणगाव बढे ठाणेदार ममताबादे यांनी प्रत्यक्ष जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन पाहणी केली.