विनाकारण फिरणाऱ्यांवर पाेलिसांनी सुरू केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:37+5:302021-04-18T04:34:37+5:30
काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसेच केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी आहे; ...
काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसेच केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी आहे; परंतु जे या आदेशांमध्ये बसत नाहीत, असे दुकानदारसुद्धा दुकाने उघडून बसत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी या अशा दुकानदारांवर व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. १७ एप्रिल रोजी अमडापूर ठाणेदार अमित वानखेडे यांनी विनाकारण मोटारसायकलवर फिरणारे व काही दुकानदार नियमांचे पालन न करता आपली दुकाने उघडी ठेवून शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली़ नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची जबाबदारी समजून मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे़