मतदानाचे दिवशी कर्मचा-यांना पगारी रजा

By Admin | Published: October 5, 2014 11:40 PM2014-10-05T23:40:03+5:302014-10-06T00:03:21+5:30

भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३५ (ब) प्रमाणे निर्देश.

Pagadara leave to employees on polling day | मतदानाचे दिवशी कर्मचा-यांना पगारी रजा

मतदानाचे दिवशी कर्मचा-यांना पगारी रजा

googlenewsNext

जळगाव जामोद (बुलडाणा): सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था व प्राधिकरणातील सर्व मतदार कर्मचार्‍यांना १५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच मतदानाचे दिवशी एक दिवसाची भरपगारी रजा देण्यात येणार आहे. यामध्ये रोजंदारीवरील कर्मचार्‍यांचा देखील समावेश आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या २४ सप्टेंबरच्या पत्रानुसार भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३५ (ब) प्रमाणे असे निर्देश देण्यात आले असल्याचे निवडणूक अधिकारी धनंजय गोगटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.मात्र प्रत्येक कर्मचार्‍यांनी मतदान केलेच पाहिजे असा दंडक निवडणूक आयोगाने घालून दिला आहे. उपरोक्त नियमांचे उल्लंघन करणार्‍या प्राधिकरण/ संस्थेतील कर्मचार्‍यांना ५00 रुपये दंडाची तरतूद करण्यात आल्याचेही निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Pagadara leave to employees on polling day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.