पालखी रस्त्याचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:31+5:302021-04-13T04:32:31+5:30
या रोडच्या दोन्ही बाजू खोदून टाकल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रोडवर कुठल्याही प्रकारचे ...
या रोडच्या दोन्ही बाजू खोदून टाकल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रोडवर कुठल्याही प्रकारचे सुचना फलक नाहीत. त्यामुळे छोटे मोठे अपघात या रोडवर घडत आहेत. जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी पर्यटकांना याच मार्गाने जावे लागते. बाजारपेठेसाठी आणि दवाखान्याच्या कामासाठी शहराकडे जाण्यासाठी हाच मार्ग महत्त्वाचा आहे. इतरही वाहनांची या मार्गावरून रोजच वर्दळ असते. दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवलेल्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या वर्दळीमुळे या मार्गावर धूळच धूळ असते. या धुळीमुळे रोडलगत शेतकऱ्यांच्या पिकाचे गेल्या वर्षभरापासून नुकसान होत आहे. रोडलगत असलेल्या बिबी, खंडाळा, किनगाव जट्टू या गावांतील वयोवृद्धांना धुळीमुळे श्वसनाचा त्रास होत आहेत. अनेक नागरिकांना रोडवरून प्रवास करताना धुळीमुळे डोळ्याचा त्रास होत आहेत. या धुळीमुळे याच मार्गावर अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. अनेकांना अपघातात अपंगत्व आले आहे. वाहन चालकांना दररोज दगड, माती, मुरमावरुन वाट काढत आपली वाहने चालवावी लागत असून, आता सावरगाव, भुमराळा येथील वाळूचे लिलाव झाले असल्याने या मार्गावर वाळूने भरलेली शेकडो ओव्हरलोड वाहने दररोज भरधाव वेगाने धावतात. अशावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीबी ते किनगाव जट्टू रोडचे काम वर्षभरापासून बंद आहे. हे काम आठवडाभराच्या आत तत्काळ सुरू करावे, अन्यथा भाजप बुलडाणाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.