पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या वेतनावर गदा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 06:12 PM2018-08-19T18:12:20+5:302018-08-19T18:12:41+5:30
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन आॅनलाइन करण्यासाठी राज्यातील ४० हजार ९९५ कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीमध्ये भरण्यात आलेली आहे; परंतु आतापर्यंत केवळ १ हजार ४०० कर्मचाºयांचेच वेतन आॅनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे जोपर्यंत १०० टक्के ग्रामपंचायत कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीमध्ये भरली जात नाही, तोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक या पंचायत समितीच्या अधिकाºयांच्या मासिक वेतनावर गदा येणार आहे.
राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायत कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीवर भरणे आवश्यक आहे. ग्रामसेवकामार्फत ग्रामपंचायत कर्मचाºयांची सर्वंकष माहिती आॅनलाइन वेतन प्रणालीवर भरण्यात येते, त्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी ती महिती पुढे प्रमाणित करतात. त्यानुसार कर्मचाºयांच्या मासिक वेतनाची माहिती राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान पुणेचे प्रकल्प संचालक यांच्या ‘लॉग-इन’मध्ये प्राप्त होते. आजपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर ४० हजार ९९५ कर्मचाºयांची माहिती वेतन प्रणालीमध्ये भरण्यात आलेली आहे. त्यानंतर गटविकास अधिकाºयांनी ही माहिती प्रमाणित करून राज्यातील केवळ १ हजार ४०० कर्मचाºयांचेच वेतन आॅनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. सर्व कर्मचाºयांची माहिती वेतन प्रणालीवर भरण्यास वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या बँक खात्यावर थेट वेतन जमा करण्याच्या पद्धतीला विलंब लागत आहे. या प्रकाराकडे ग्राम सचिवांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. १०० टक्के ग्रामपंचायत कर्मचाºयांची माहिती आॅनलाइन प्रणालीमध्ये भरली जात नाही, तोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांचे मासिक वेतन अदा न करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांना १८ आॅगस्ट रोजी दिल्या आहेत.
ग्रामपंचायत कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीमध्ये भरण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाकडून आल्या आहेत. यासंदर्भात पत्र प्राप्त झाले असून, कर्मचाºयांची माहिती आॅनलाइन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आलेले आहे.
- संजय चोपडे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
जिल्हा परिषद, बुलडाणा.