पंचायत समितीला नविन प्रशासकीय इमारत मिळावी! - शिवसेना जिल्हाप्रमुखांची  मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:27 PM2018-02-12T13:27:47+5:302018-02-12T13:29:46+5:30

बुलडाणा :पंचायत समितीसाठी नविन प्रशासकीय इमारत बांधून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, सभापती जालींधर बुधवत यांनी ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादा भुसे यांचेकडे केली आहे.

Panchayat committee should get new administrative building! - Demand of Shivsena | पंचायत समितीला नविन प्रशासकीय इमारत मिळावी! - शिवसेना जिल्हाप्रमुखांची  मागणी

पंचायत समितीला नविन प्रशासकीय इमारत मिळावी! - शिवसेना जिल्हाप्रमुखांची  मागणी

Next
ठळक मुद्देमागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, सभापती जालींधर बुधवत यांनी ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादा भुसे यांचेकडे केली आहे.स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पंचायत समितीची इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आहे. पंचायत समितीची जागा खाली करण्यास वेळोवेळी पंचायत समितीला सुचना प्राप्त होत आहे.


बुलडाणा :  येथील पंचायत समितीची इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आहे. पंचायत समितीसाठी नविन इमारतीची अनेक वर्षापासून प्रतीक्षा आहे. त्यातुळे पंचायत समितीसाठी नविन प्रशासकीय इमारत बांधून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, सभापती जालींधर बुधवत यांनी ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादा भुसे यांचेकडे केली आहे.बुलडाणा येथे दौºयानिमित्त १० फेब्रुवारी रोजी ना.भुसे आले होते. यानिमित्ताने पंचायत समितीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व बºयाच वर्षापासून रेंगाळलेला प्रश्न जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी मांडला. याबाबत सविस्तर निवेदनही सादर केले. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पंचायत समितीची इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आहे. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयास जागेची कमतरता असल्यामुळे त्यांचेकडून पंचायत समितीची जागा खाली करण्यास वेळोवेळी पंचायत समितीला सुचना प्राप्त होत आहे. त्यामुळे बुलडाणा पंचायत समितीला प्रशासकीय इमारत बांधून मिळणेसाठी जागा व निधी मिळावा अशी मागणी जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी केली आहे.

Web Title: Panchayat committee should get new administrative building! - Demand of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.