पंढरीनाथ पाटील यांचे जीवन  चरित्र प्रेरणादायी - देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:03 AM2017-10-06T00:03:22+5:302017-10-06T00:04:03+5:30

चिखली : दलितमित्र पंढरीनाथ पाटील यांनी अनंत अडचणींवर  मात करून बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली  आहे. ज्या काळात त्यांनी हे कार्य केले, त्या काळात बहुजन  समाजाला शिक्षणाची व्यवस्थाच नव्हती; तसेच कोणतेही कार्य  परिo्रमपूर्वक पूर्ण केल्या जाते, हे त्यांच्या चरित्रातून अधोरेखीत  होत असून, त्यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन  o्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख  यांनी केले.

Pandharinath Patil's life character inspirational - Deshmukh | पंढरीनाथ पाटील यांचे जीवन  चरित्र प्रेरणादायी - देशमुख

पंढरीनाथ पाटील यांचे जीवन  चरित्र प्रेरणादायी - देशमुख

googlenewsNext
ठळक मुद्देपंढरीनाथ पाटील स्मृती समारोह उत्साहात२ ऑक्टोबर रोजी शिवाजी कलामंदिरात पार पडला



लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : दलितमित्र पंढरीनाथ पाटील यांनी अनंत अडचणींवर  मात करून बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली  आहे. ज्या काळात त्यांनी हे कार्य केले, त्या काळात बहुजन  समाजाला शिक्षणाची व्यवस्थाच नव्हती; तसेच कोणतेही कार्य  परिo्रमपूर्वक पूर्ण केल्या जाते, हे त्यांच्या चरित्रातून अधोरेखीत  होत असून, त्यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन  o्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख  यांनी केले.
दलितमित्र, समाजभूषण, महात्मा फुलेंचे आद्यचरित्रकार स्व. पंढरीनाथ पाटील यांचा स्मृती समारोह स्थानिक o्री शिवाजी  कलामंदिरात २ ऑक्टोबर रोजी पार पडला. o्री शिवाजी शिक्षण  संस्थेच्या जिल्हय़ातील सर्व विद्यालये व महाविद्यालयांच्यावतीने  या स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे होते तर  उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. यावेळी  सिद्धहस्त लेखक बाबा भांड, संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे,  रामचंद्र शेळके, अँड.गजानन पुंडकर, दिलीप इंगोले, हेमंत  काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, अँड.अशोकराव  ठुसे, माजी आमदार वसंतराव खोटरे, आजिव सभासद  शिवशंकर पाटील, अँड. प्रतापराव भोंडे, ना.जा.दांडगे, विष्णू हरी  पडघान, सखाराम सोनुने, शिवसिंग परिहार, मधुकर पाटील, सं तोषराव डुकरे, जगदेवराव बाहेकर, माधवराव बाहेकर, अरूण  देशमुख, केशवराव गायकवाड, भीमराव काळे, तोताराम  काळवाघे, जानराव पाटील, पांडुरंग पाटील, नामदेव राऊत,  भालचंद्र पवार, उत्तमराव लहाने, त्र्यंबक काळवाघे, भास्करराव  पाटील, अँड.शा.का.कळसकार, o्रीमती सोनुने, अशोक  चव्हाण, प्रल्हाद वानखेडे, सत्यजीत राऊत, शंतनु पाटील, प्र ितभा पाटील, बी.आर.पाटील, प्रभाकर बाहेकर, रामेश्‍वर पाटील,  शरद पाटील, संस्थेचे स्विकृत सदस्य प्राचार्य पी.एस.वायाळ,  प्राचार्य डॉ.एन.बी.भुसारी, प्रा.भागवत बारोटे, पवार यांच्यासह  शिवपरिवारातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती.  यावेळी बोलताना तात्यासाहेब बोंद्रे यांनी पंढरीनाथ पाटील यांच्या  समवेत घालविलेल्या आठवणींना उजाळा दिला. प्रसंगी उपस्थि त मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक प्राचार्य  बारोटे, परिचय प्राचार्य डॉ.पी.एस.वायाळ, संचालन डॉ.अनंत  चेके पाटील तर आभार प्राचार्य डॉ.भुसारी यांनी मानले. 

Web Title: Pandharinath Patil's life character inspirational - Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.