दिवठाणा येथील गावकर्यांना आवास योजनेतंर्गत घरकुले द्यावी- पांडुरंग फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:05 AM2017-12-01T10:05:08+5:302017-12-01T10:07:22+5:30

ज्ञानगंगा प्रकल्पातंर्गत येणार्या दिवठाणा गावातील नागरिकांना जवळपास जागा देवून त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई घरकूल योजनेमधून घरकुलांचा लाभ द्यावा, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी दिल्या.

Pandurang Phundkar said that the houses should be given under the housing scheme for the villagers of Dinarhatna- Pandurang Phundkar | दिवठाणा येथील गावकर्यांना आवास योजनेतंर्गत घरकुले द्यावी- पांडुरंग फुंडकर

दिवठाणा येथील गावकर्यांना आवास योजनेतंर्गत घरकुले द्यावी- पांडुरंग फुंडकर

Next
ठळक मुद्देदिवठाणा गावातील नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करावेअनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकाना रमाई घरकूल योजनेमधून घरकुलांचा लाभ द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ज्ञानगंगा प्रकल्पातंर्गत येणार्या दिवठाणा गावातील अतिक्रमीत जागेवर काही नागरिकांची घरे आहेत. या अतिक्रमीत जागांवर असलेले नागरिकांना जवळपास जागा देवून त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे. त्यासाठी या जागेवर पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत त्यांना घरकुले देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई घरकूल योजनेमधून घरकुलांचा लाभ द्यावा, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी दिल्या.
    ज्ञानगंगा प्रकल्प बाधीत दिवठाणा गावातील अतिक्रमीत जागेवर घरकुलासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे आदी उपस्थित होते. काळेगांव फाट्यावरील जागेची पाहणी करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, दिवठाणा गावातील  या गावकर्यांचे पुनर्वसन झाल्यानंतर ज्ञानगंगा प्रकलपाचे काम पूर्ण होईल. त्यामुळे अतिक्रमीत जागेवरील नागरिकांचे पुर्नवसन करणे आवश्यक आहे. याप्रसंगी पुनर्वसन, लघु पाटबंधारे, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Pandurang Phundkar said that the houses should be given under the housing scheme for the villagers of Dinarhatna- Pandurang Phundkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.