पानी फाैंडेशनचे सल्लागार अविनाश पोळ आज मोताळा तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:13+5:302021-07-09T04:23:13+5:30

पाण्याचा डॉक्टर म्हणून अविनाश पोळ यांची जनसामान्यात ओळख असून साधारण वीस वर्षांपासून ते राज्यात जलसंधारण व ग्राम स्वच्छता अभियानात ...

Pani Foundation Advisor Avinash Pol in Motala taluka today | पानी फाैंडेशनचे सल्लागार अविनाश पोळ आज मोताळा तालुक्यात

पानी फाैंडेशनचे सल्लागार अविनाश पोळ आज मोताळा तालुक्यात

googlenewsNext

पाण्याचा डॉक्टर म्हणून अविनाश पोळ यांची जनसामान्यात ओळख असून साधारण वीस वर्षांपासून ते राज्यात जलसंधारण व ग्राम स्वच्छता अभियानात निरंतर काम करीत आहेत. समृद्ध ग्राम स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा हा मोताळा तालुक्याचा नियोजित दौरा आहे. ९ जुलै रोजी मोताळा तालुक्यातील दाभा येथे सकाळी ९ वाजता ते शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी मोताळा पंचायत समितीमध्ये तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांशी संवाद साधणार आहेत. दुपारी चार वाजता बुलडाणा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशीही ते बुलडाणा येथे समृद्ध गाव स्पर्धेच्या निमित्ताने संवाद साधून चर्चा करणार आहेत. त्यानंतर तिघरा येथे सायंकाळी ग्रामस्थांशी ते संवाद साधतील.

मोताळा तालुक्यातील काम चांगले--

मागील तीन ते चार वर्षात मोताळा तालुक्यात पानी फाैंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचे चांगले काम झाले आहे. यासोबतच मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावाने राज्यस्तरीय दि्वतीय क्रमांकापर्यंत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत मजल मारली होती, हे विशेष. त्यामुळे समृद्ध गाव स्पर्धेमध्येही तालुक्यातील गावांचा सहभाग आहे.

Web Title: Pani Foundation Advisor Avinash Pol in Motala taluka today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.