दोन वाघांच्या वावराने माकनेर परिसरात दहशत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 11:23 AM2021-07-24T11:23:41+5:302021-07-24T11:23:57+5:30

Panic in Makner area by two tigers : माकनेर परिसरात दोन वाघांचा वावर असल्याने शुक्रवारी एकच दहशत निर्माण झाली.

Panic in Makner area by two tigers! | दोन वाघांच्या वावराने माकनेर परिसरात दहशत!

दोन वाघांच्या वावराने माकनेर परिसरात दहशत!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूरः तालुक्यात रानडुक्कराच्या हल्ल्यात बेलाड तेथील शेतकरी महिला गंभीर जखमी झाली. या घटनेची शाई वळते ना वळते तोच माकनेर परिसरात दोन वाघांचा वावर असल्याने शुक्रवारी एकच दहशत निर्माण झाली. वनखात्याने या प्रकाराची चौकशी करून सतर्कतेचा इशारा गावकऱ्यांना दिल्याने या माहीतीस दुजोरा मिळाला आहे.
तालुक्यातील मौजे वडोदा, वरखेड, जांभुळधाबा, नरवेल, देवधाबा अशा विविध शिवारात जंगली जनावरांचा वावर आहे. असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांची नासाठी केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी बेलाड येथील शेतकरी महिलेवर रानडुक्कराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात रानडुक्कराने शेतकरी महिलेचा हात तोडला होता. या प्रकाराने तालुक्यात चांगलीच दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर   शुक्रवारी तालुक्यातील मौजे माकनेर शिवारात दोन वाघांचा वावर असल्याची चर्चा पंचक्रोशीत आहे. सोशल मिडीयावर देखील त्याचा उहापोह करण्यात येत असल्याचे माकनेर परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
या प्रकाराविषयी गावकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी माहीतीस दुजोरा दिला आहे. वनविभागाची चमू परिसरातील आल्याचे सांगत पंचक्रोशीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दवंडीच्या माध्यमातून देण्याबाबतच्या सुचना सरपंचांना दिल्याच गावकऱ्यांनी सांगितले. 
मलकापूर शहर पोलीसात देखील काही गावकऱ्यांनी या प्रकाराविषयी संपर्क साधला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वन विभागाच्या पथकानेही केली पाहणी
  या भागात वनविभागाच्या पथकानेही पाहणी केली असल्याची माहिती आहे. वाघाच्या पंजाच्या सदृश्य पायाचे ठसे या भागातील शेतात आढळले असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Panic in Makner area by two tigers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.