आई-वडिलांनी सुसंस्कारित मुले घडवावीत : हरिभाऊ वेरूळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:00+5:302021-09-04T04:41:00+5:30

यावेळी आचार्य वेरूळकर गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश राईतकर, गोपाल पितळे, अशोक अडेलकर, दीपक फुलउंबरकर, ओमप्रकाश राईतकर, ...

Parents should bring up cultured children: Haribhau Verulkar | आई-वडिलांनी सुसंस्कारित मुले घडवावीत : हरिभाऊ वेरूळकर

आई-वडिलांनी सुसंस्कारित मुले घडवावीत : हरिभाऊ वेरूळकर

Next

यावेळी आचार्य वेरूळकर गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश राईतकर, गोपाल पितळे, अशोक अडेलकर, दीपक फुलउंबरकर, ओमप्रकाश राईतकर, शंकर सुर्वे यांच्यासह नागरिक व महिलांची उपस्थिती होती.

प्राचीन नृसिंह मंदिर व जागृत विश्वकर्मा मंदिर येथे भेट

बुलडाणा जिल्ह्यातील आदर्श गाव करणारे, सुसंस्कार शिबिराचे जनक, आदर्श विद्यार्थी घडवणारे, राष्ट्रधर्म प्रचार समितीचे प्रमुख तथा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक गुरुवर्य आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी प्राचीन नृसिंह मंदिर येथे भेट दिली. यावेळी गोपाल महाराज यांनी नृसिंह मंदिरासंबंधित सर्व माहिती आचार्य वेरूळकर गुरुजी यांना सांगितली. यावेळी अशोक अडेलकर उपस्थित होते.

विश्वकर्मा मंदिर येथे भेट

आचार्य वेरूळकर गुरुजी यांनी शारंगधर नगरीतील जागृत प्रभू विश्वकर्मा मंदिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रभू विश्वकर्मा पूजन केले. ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक फुलउंबरकर उपस्थित होते. मंदिरासंदर्भात गणेश राऊत यांनी गुरुजींना माहिती सांगितली. गुरुजी यांच्यासोबत मनोज चौभे, रवि वानखेडे व गोंदिया येथील सुसंस्कार वर्ग घेणारे शिक्षक चंदू आसदकर उपस्थित होते.

Web Title: Parents should bring up cultured children: Haribhau Verulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.