पालकांनो, लहान मुलांना जपा; कोरोनाचा धोका वाढतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:25+5:302021-04-05T04:30:25+5:30
काळजी घ्या, घाबरू नका लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहत असल्याने घाबरण्याचे कुठलेच कारण नाही. तरीसुद्धा प्रत्येक पालकाने आपल्या मुलांची ...
काळजी घ्या, घाबरू नका
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहत असल्याने घाबरण्याचे कुठलेच कारण नाही. तरीसुद्धा प्रत्येक पालकाने आपल्या मुलांची सध्या विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. योगिता शेजोळ, बालरोग तज्ज्ञ.
कोरोना झाल्यानंतर मोठ्या माणसांना जी औषधी दिली जाते, ती लहान मुलांसाठी लागू नाही. त्यामुळे पालकांनी अशी कुठलीही औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना देऊ नये. काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे.
- डॉ. योगेश शेवाळे, बालरोग तज्ज्ञ.
काय आहेत लक्षणे
सध्या कोरोना विषाणूची तीनच अधिकृत लक्षणे आहेत. त्यामध्ये ताप, खोकला, गंध आणि चव जाणे. यापैकी कुठलेही लक्षण असणाऱ्या व्यक्तीला होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात येत आहे. लहान मुलांना अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे.
एप्रिल महिन्यात धोका वढला
१ एप्रिल ७१०
२ एप्रिल ६६५
३ एप्रिल ९२९
एकूण रुग्णसंख्या
४१,०७०