पारखेड ग्रामस्थांचाही बहिष्कार
By admin | Published: October 2, 2014 11:34 PM2014-10-02T23:34:27+5:302014-10-02T23:34:27+5:30
विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्काराचा इशारा पारखेड येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
खामगाव (बुलडाणा) : विजेअभावी शेतकरी विहिरीत पाणी असून सुध्दा पाणी देवू शकत नाही. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी पिके करपू लागली आहेत, त्यामुळे विजेसह इतर समस्या सोडवाव्या अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्काराचा इशारा पारखेड येथील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी पहिलेच उशिरा पाऊस आल्यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. आज वीज मंडळ शेतकर्यांना वीज देत नाही वीज आली तर कमी दाबाची येते त्यामुळे मोटारपंप चालत नाही. कमी दाबाच्या पुरवठय़ामुळे मोटारपंप जळत आहे. अपुर्या पावसामुळे विहिरींना पाणी कमी आहे. त्यामुळे गहू, कांदा रब्बीचे पिके घेता येणार नाही. सद्या खरीपाच्या िपकांना पाणी देवून उत्पन्न काढण्याचा शेतकर्यांचा आटापिटा आहे. परंतु ऐन पिकाला पाण्याची आवश्यकता असून विजेअभावी पाणी देता येत नाही. पाण्याऐवजी खरीपाचे पिके हातून गेले तर शे तकरी देशोधडीला लागेल.तरी पूर्ण दाबाची वीज २४ तास उपलब्ध करून द्यावी आणि पिक आणेवारी व विमा कंपन्यांनी काढलेल्या विम्याचे पैसे शेतकर्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे. अन्यथा १५ ऑक्टोबर रोजी होणार्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर राजु नाकाडे, प्रदीप देशमुख, प्रल्हाद खराटे, गणेश गावंडे, निलेश देवचे, मनोहर वांडे, नितीन शेवणे, अमोल हेलगे आदिंच्या सह्या आहेत.